Images

Images
Maze Antarang

Saturday, August 22, 2015

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये शतक झळकाविणारा सलामीवीर शिखर धवनला हाताच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांमधून माघार घ्यावी लागली. यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 0-1 अशा पिछाडीवर असणाऱ्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. दुसरा नियमित सलामीवीर मुरली विजयही दुखापतीमुळे यापूर्वीच मालिकेतून बाहेर पडला आहे. 

पहिल्या सामन्यात पहिल्याच दिवशी क्षेत्ररक्षण करताना धवनच्या उजव्या हाताला फ्रॅक्‍चर झाले होते. सुरवातीला झालेल्या निदानापेक्षा ही दुखापत गंभीर निघाली. त्यामुळे धवनला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (सोमवार) जाहीर केला. विशेष म्हणजे, अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी दुसऱ्या कसोटीपूर्वी संघात दाखल होईल, असे ‘बीसीसीआय‘ने कालच जाहीर केले होते. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यास 20 ऑगस्टपासून सुरवात होत आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज कुमार संगाकारा या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

No comments:

Post a Comment