Images

Images
Maze Antarang

Tuesday, July 19, 2011

Nice article of Shruti Panse

पालकांची तक्रार असते की, मुलांना शाळेत शिकवलेलं समजत नाही. कधीकधी मुलंच घरी येऊन सांगतात की, आम्हाला अमुक समजलं नाही, म्हणून लिहिता आलं नाही. पेपर चुकीचा सोडवला की, मग मुलं कबूल करतात की, आम्हाला हे समजलंच नव्हतं. असं का होतं? विशिष्ट विषयाच्या बाबतीत होतं की, सर्वच विषयांच्या बाबतीत होतं? हे आपण समजून घेतलं, तर मुलांना मदत करू शकू.

समजा शाळेत एखादी गणित किंवा विज्ञानाची संकल्पना शिकवली, तर काय काय घडू शकतं?

- एखादी नवी संकल्पना शिकवली की, ती लगेच समजली आणि पक्की लक्षात राहिली, असं नेहमी होत नाही. 

- शिक्षकांनी शिकवल्यावर ते समजलेलं असतं किंवा अजिबात समजलेलं नसतं. पूर्ण डोक्यावरून गेलेलं असतं.

- किंवा वर्गात असताना समजल्यासारखं वाटतं; पण नंतर काहीच आठवत नाही.

- वर्गात फारसं समजलेलं नव्हतं; पण नंतर वही / पुस्तक वाचल्यावर अर्थ नीट समजत गेला.

यापैकी एखादी प्रक्रिया घडते.

याचा अर्थ असा की, केवळ शिक्षकांचं शिकवणं पुरेसं नसतं. त्यावर उजळणी झाली पाहिजे. शिकवलेलं पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. त्यातला काही भाग लिहून काढला पाहिजे किंवा मग मनातल्या मनात आठवून पाहिला पाहिजे. ही प्रक्रिया घडली, तर शिकवलेल्या अभ्यासाचं आकलन झालं, असं म्हणता येतं आणि आकलन हा तर पाया आहे. आकलन झालं तरच मूल परीक्षेत ते लिहू शकेल. अन्यथा त्याला घोकंपट्टीच्या आडवळणाने जावं लागतं.

काही केल्या याला/तिला कळत नाही, असं पालक किंवा शिक्षक म्हणतात. तेव्हा यातल्या एखाद्या पायरीवर मूल अडून राहिलेलं असतं. ती पायरी ओळखणं हे काम घरी शांतपणाने केलं पाहिजे. नेमकी अडचण कुठे आहे हे कळायला हवं. ती अडचण समजली आणि ती दूर केली, तर मुलांना सोपं जातं.

कळत नाही/समजत नाहीचा धोशा लावला, तर मूल तेच मनात घेऊन बसतं. ते बाहेर काढणं अवघड. वाईट गोष्ट अशी की, याला/हिला समजत नाही, असा शिक्काच बसतो, ते होऊ देऊ नये.



- र्शुती पानसे