Images

Images
Maze Antarang

Saturday, September 3, 2011

नोट्स, प्रॅक्टिकल्स, सबमिशन, त्यांच्या तारखा,

नोट्स, प्रॅक्टिकल्स, सबमिशन, त्यांच्या तारखा, लेक्चर्सचे टाईम-टेबल, परीक्षेचे टाईम-टेबल, गेल्या परीक्षेतील मार्क्‍स हे सारे नावडते विषय एकीकडे आणि दुसरीकडे मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस, उधारीचे हिशेब, फस्र्ट डे फस्र्ट शोचे प्लॅनिंग..काय डोक्यात ठेवावे अन् काय नाही..? कसे काय मॅनेज करणार.? तुमची सगळी कामं वेळच्या वेळी करून देणारी एक भन्नाट गोष्ट..



होमवर्क या प्रकारापासून शाळेनंतर सुटका झाली, असं वाटत असतानाच ट्युशनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी फिजिक्सच्या सरांनी सांगितलं, ‘सोमवारी पहिल्या चॅप्टरच्या नोट्स आहे तशा लिहून आणा.’

आम्ही बुचकाळ्यात पडणार याची त्यांना बहुदा खात्री होती. आमच्या भांबावलेल्या चेहर्‍याकडे पाहत ते म्हणाले, ‘तुम्हालाच सांगतोय. शाळा संपली तरी होमवर्क मात्र संपलेला नाही. उद्याच्या रविवारी दोन-चार तास काढा. पहिला चॅप्टर वाचा. काढलेल्या नोट्स पुन्हा लिहा, नव्या वहीत. सोमवारी सकाळी पहिल्या पंधरा मिनिटांत सगळ्यांच्या होमवर्कच्या वह्या मी तपासणार आहे. होमवर्क केला नसेल तर ट्युशनला येऊ नका. चला आता. पुढची बॅच वाट पाहतेय.’

अकरावीत आल्यानंतर गणवेशातून सुटका झाली; पण होमवर्कमधून नाही. पुढे फिजिक्सच्या जोडीला इतर विषयही आले. नोट्स, प्रॅक्टिकल्स, सबमिशन हे प्रकार ओघाने आलेच. त्यांच्या तारखा, लेक्चर्सचे टाईमटेबल, परीक्षेचे टाईमटेबल, गेल्या परीक्षेतील मार्क्‍स आणि सोबतीला मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस, उधारीचे हिशेब, फस्र्ट डे फस्र्ट शोचे प्लॅनिंग..काय डोक्यात ठेवावे अन् काय नाही..असं होऊ लागतं. अशा वेळी कामाला येतं ते ‘स्टुडंट डॉग ऑर्गनायझर’ नावाचं सॉफ्टवेअर !

इंटरनेटवर अनेक टास्क मॅनेर्जस आणि कॅलेंडर्स उपलब्ध आहेत; परंतु स्टुडंट डॉग ऑर्गनायझर हे सॉफ्टवेअर केवळ विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आलेलं ‘मोफत’ सॉफ्टवेअर आहे. तुमच्याकडे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप असेल, तर तुम्ही हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्यावर इन्स्टॉल करू शकता. यात कॉन्टॅक्टस, कॅलेंडर, टास्क्स, नोट्स, ग्रेड आदि सर्व सुविधांचा समावेश केलेला आहे. या सॉफ्टवेअरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक विभागात एण्टर केलेली माहिती तुम्हाला एका नजरेत ओव्हरव्ह्यू विभागात पाहायला मिळते. यातील प्रत्येक विभागाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ.



कॉन्टॅक्टस्

या विभागात तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींचे, सरांचे कॉण्टॅक्ट डिटेल्स स्टोअर करून ठेवू शकता. यात नाव, पत्त्यासह फोन, मोबाईल, ई-मेल अँड्रेस, स्काईप आयडी, वाढदिवस आदि माहिती नोंदवून ठेवता येते. वाढदिवस नोंदवून ठेवला असेल, तर त्या-त्या दिवशी ओव्हरव्ह्यू विभागात तुम्हाला वाढदिवसाची आठवणही करून दिली जाते. ही सोय आपल्या मोबाईल आणि फेसबुकसारख्या साईटवरही असली तरी शाळा, कॉलेजशी संबंधित इतर सर्व माहितीही आपल्याला या सॉफ्टवेअरमध्ये मिळते. आऊटलूकसारख्या अँप्लिकेशनमध्ये तुम्ही अगोदरच कॉन्टॅक्टस स्टोअर केलेले असतील तर ते थेट या सॉफ्टवेअरमध्ये इम्पोर्ट करता येतात.



कॅलेंडर

सर्वसामान्य डेस्कटॉप कॅलेंडरसारखे हेही कॅलेंडर आहे. महिना व तारीख निवडून कोणत्या वेळी काय काम करायचे आहे, याची नोंद यात ठेवता येते. ओव्हरव्ह्यू विभागात तुम्ही नोंदवलेल्या बाबींची आठवण तुम्हाला करून दिली जाते. ठराविक प्रकारच्या बाबी (उदा. असाईनमेंट सबमिशन) चटकन ओळखू याव्यात यासाठी काही विशिष्ट आयकॉन्सही यात देण्यात आले आहेत.



टास्क्स

या विभागात तुम्ही तुम्हाला संपवायच्या कामांची यादी तयार करून ठेवू शकता. आधी विषयांची यादी तयार करून (उदा. फिजिक्स) त्यानंतर त्यातील कामांची यादी करावी (उदा. चॅप्टर 1 होमवर्क, चॅप्टर 2 प्रॅक्टिकल इ.). यादीतील नोंदी वर किंवा खाली सरकवून अग्रक्रमही तुम्ही ठरवू शकता.



नोट्स

टास्क्सप्रमाणेच नोट्स विभागातही विषयांची यादी करून त्याअंतर्गत विविध प्रकारच्या नोट्स तयार करू शकता. तुमच्या वर्गात लॅपटॉप वापरण्यास परवानगी असेल, तर शिकवत असतानाच तुम्ही थेट लॅपटॉपवर नोट्स टाईप करून घेऊ शकता. या नोट्स थेट मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येही टाईप करून घेता येतात. त्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन काही बदल करावे लागतील.



मार्क्‍स

हा विभाग खरंच भन्नाट आहे. आपल्या कामगिरीचा आलेख मांडण्यासाठी या विभागाचा खूप चांगला उपयोग करता येऊ शकतो. सेटिंग्जमध्ये जाऊन आपण शिकत असलेल्या विषयांची यादी तयार केल्यानंतर त्यापुढे विविध पातळ्यांवर मिळालेल्या गुणांचा तक्ता आपल्याला मांडता येतो. यात मार्क, टक्केवारी, ग्रेड पॉइंट्स असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडून आपल्या कामगिरीवर आपल्यालाच लक्ष ठेवता येऊ शकते. आपण कुठे कमी पडतोय, कुठे सुधारणा करणे गरजेचे आहे याचा अंदाज येऊ शकतो.



टाईमटेबल

टाईमटेबल हा शाळा, कॉलेजातील महत्त्वाचा घटक. सोमवारी साडे-अकराला कुणाचं लेक्चर आहे, असं विचारल्यानंतर चटकन - गोरे सरांचं - असं सांगता येणारे विद्यार्थी बोटावर मोजण्याइतके असतील. नोटीस बोर्डावर आपल्या वर्गाचं टाईमटेबल शोधत बसण्यापेक्षा आपल्या लॅपटॉपमध्ये फीड केलेलं केव्हाही बरं. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही एका आठवड्याचे विषयवार टाईमटेबल अगदी कलर कोडिंगसह फीड करू शकता. टाईमटेबल फीड केल्यानंतर ओव्हरव्ह्यू विभागात आता किती वाजले आहेत, कोणतं लेक्चर सुरू आहे, यानंतर कोणतं लेक्चर आहे आदि सगळ्या गोष्टी दिसायला लागतात.

प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक यांना अत्यंत उपयोगी ठरेल, असे हे सॉफ्टवेअर झेक रिपब्लिकमधील डेव्हिड कॅप्का या प्रोगॅमरने तयार केले आहे. खालील लिंकवरून स्टुडंट डॉग ऑर्गनायझर डाऊनलोड करून घेऊ शकता. हे सॉफ्टवेअर विंडोजच्या कोणत्याही व्हर्जनवर इन्स्टॉल करून वापरता येऊ शकते.

http://www.islandsw.org/

No comments:

Post a Comment